किल्ले रायगडावर दगड कोसळून दोन होमगार्ड जखमी

किल्ले रायगडावरील नाणे दरवाजा येथील पायरी मार्गावर दगडी कोसळल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तैनात करण्यात आलेले दोन होमगार्ड जवान जखमी झाल्याची घटना आज रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. या दोन्ही जखमी होमगार्डवर पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. रोहित कदम आणि प्रणय मोरे अशी या  होमगार्डची  नावे आहेत.