श्रीनगर ते कटरा 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार

श्रीनगर ते कटरा या दरम्यान 4 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी श्रीनगर ते कटरा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या चार वंदे भारत कटरा, जम्मू, बनिहाल आणि बारामुला या ठिकाणी वेगवेगवेळ्या मार्गावर धावताना दिसणार आहेत. यामुळे स्थानिकांसोबत तीर्थ यात्रा करणाऱया भाविकांनाही याचा फायदा मिळेल. जम्मू-तवी श्रीनगर वंदे भारत आठवडय़ातून 6 दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी दररोज सकाळी 8.10 वाजता वैष्णो देवी कटराहून बनीहाल मार्गे 11.10 वाजता श्रीनगर स्टेशनला पोहोचेल. कटराहून श्रीनगर जाणाऱया वंदे भारतचे चेअरकार भाडे 715 रुपये तर एक्झीक्यूटिव्ह क्लासचे भाडे 1320 रुपये आहे.