प्रसन्न-सूर्यकांत गोळे विजेते

आयडियल स्पोर्टस् अकॅडमी आयोजित विविध जिह्यांतील राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर कॅरमपटूंसह शालेय खेळाडू व पालकांच्या 34 जोडय़ांमध्ये झालेल्या जगन्नाथराव हेगडे चषक दुहेरी कॅरम स्पर्धेमध्ये पोद्दार स्कूल मालाडची प्रसन्न गोळे व पालक सूर्यकांत गोळे ही जोडी विजेती ठरली. प्रारंभी 0-4 असे पिछाडीवर पडलेल्या प्रसन्न-सूर्यकांत गोळे जोडीने उत्तरार्धात अचूक फटकेबाज खेळ करीत उदयोन्मुख शालेय कॅरमपटू वसईच्या आयएनजी शाळेच्या श्रीशान पालवणकर व पालक हेमंत पालवणकर जोडीचे आव्हान 10-4 असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. परळ येथील आरएमएमएस सभागृहात अटीतटीमध्ये रंगलेल्या उपांत्य सामन्यात श्रीशान-हेमंत पालवणकर जोडीने काwस्तुभ-मंगेश जागुष्टे जोडीचा 9-9 अशा बरोबरीनंतर निर्णायक बोर्डमध्ये 10-9 असा एका गुणाने पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये प्रसन्न-सूर्यकांत गोळे जोडीने ग्रीष्मा-महेंद्र धामणकर जोडीवर 10-1 अशी मात करून अंतिम फेरीत धडक दिली.