
मोबाईलवर इन्स्टाग्रामवरील रिल बघत एक तरुण रस्त्याने चालत होता. तेवढय़ात पांढऱ्या रंगाचे हेल्मेट घालून दुचाकीवरून आलेल्या चोराने तरुणाच्या हातातला मोबाईल हिसकावून नेला, पण त्याच्या पांढऱ्या रंगाच्या हेल्मेटच्या आधारे शिवडी पोलिसांनी चोराला पकडले.
प्रिन्स कुमार (22) हा तरुण रे रोड स्थानकाबाहेर रस्त्याने मोबाईलवर रिल बघत जात होता. तेवढय़ात मागून दुचाकीवरून आलेल्या चोराने प्रिन्सच्या हातातला मोबाईल हिसकावून नेला. याबाबत तक्रार झाल्यानंतर शिवडी पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला. आरोपीने पांढऱ्या रंगाचे हेल्मेट घातले होते. त्यावरून तपास करत पोलिसांनी नळबाजार परिसरात राहणारा सुफियान अन्सारी (27) याला पकडले. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल आणि गुह्यांत वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.