
राज्य सरकारने आज चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यशदाच्या उप महासंचालपदावर सचिन कलंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे(ठाणे) मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अमरावती महापालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांची यशदावर नियुक्ती झाली आहे. सौम्या शर्मा चांडक यांची अमरावती महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. जितिन रहमान यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.



























































