Pune News – पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवारी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला. दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीटवरील जुनं ओयसिस हॉटेल शेजारी सुरु असलेल्या बांधकामस्थळी ही दुर्घटना घडली. यात एका तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले. बांधकाम सुरु करताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.