
टीआरपी कमी झाल्याने दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या भागाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासाठी ऑडिशनही घेतली जात आहे, परंतु ‘चला हवा येऊ द्या-2’ च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून डॉ. नीलेश साबळेला डच्चू देण्यात आला आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिग्दर्शनापासून सूत्रसंचालनापर्यंतची सर्व जबाबदारी नीलेश साबळे सांभाळत होता, परंतु आता नीलेश साबळेच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.