
भारत इस्रायलकडून लाँग रेंज आर्टिलरी खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये सुपरसोनिक वेग आणि 400 किलोमीटरची रेंज आहे. पहलगाम हल्ल्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यापुढे पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ राबवण्याची वेळ आली तर त्याची तयारी म्हणून भारत आधीच जोरदार तयारी करत आहे. इस्रायलकडून खरेदी करण्यात येणाऱ्या लोरा मिसाईलची सध्या जोरदार चर्चा आहे. लोरा मिसाईलला इस्रायलची संरक्षण कंपनी इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने डेव्हलप केले आहे. ही एक बॅलेस्टिक थिएटर मिसाईल आहे. या मिसाईलची खासियत म्हणजे याला जमीन आणि समुद्र अशा दोन्ही ठिकाणांवरून लाँच केले जाऊ शकते. पाकिस्तान आणि चीनविरोधात लढाईसाठी भारत इस्रायलकडून ‘लोरा’ची खरेदी करू शकतो.