उत्कर्ष नाईट हायस्कूलचे घवघवीत यश

वरळी येथील शिक्षणप्रेमी मंडळाच्या संचालित उत्कर्ष नाईट हायस्कूलचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला आहे. या रात्र शाळेतील शाळेतील अर्चना सुर्वे हिने 60 टक्के गुण मिळवून प्रथम तर रेश्मा पाखरे हिने 58.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. वर्षा कचरे हिने 57.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी रूपाली समगिसकर ही 50.40 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. या यशामध्ये मासुम या सामाजिक संस्थेच्या संचालिका निकिता केतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थ्यांना मंडळाचे सचिव एम.वाय. पवार, अध्यक्ष काब्रा, खजिनदार मिनल वगळ व मुख्याध्यापक शिवदास जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.