पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै ते 10 जुलैदरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते पहिल्यांदाच पाच देशांपैकी तीन देशांना घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच नामिबियाला भेट देणार आहेत. त्यांचा दौरा घाना येथून सुरू होईल. त्यानंतर ते त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना आणि ब्राझीलला जातील. ब्राझीलमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर मोदी नामिबियाला पोहोचतील.