
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या वन बिग ब्युटीफुल बिलाची मोठी चर्चा सुरू होती. याच विधेयकावरून उद्योगपती एलन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मतभेद सुरू होते. हे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर झाले आहे. वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट असे या वेयकाचे नाव असून हे विधेयक सिनेटमध्ये 51-50 च्या फरकाने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर आज मतदान घेण्यात आले. आता हे विधेयक प्रतिनिधी सभागृहात जाणार आहे.