खड्डेमुक्त उल्हासनगरसाठी ट्रॅफिक पोलिसांच्या हाती ‘फावडे

शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासन निष्क्रिय ठरत आहे. मात्र खड्डेमुक्त उल्हासनगरसाठी ट्रॅफिक पोलीस ‘इन अ‍ॅक्शन’ मोडवर आली असून पोलिसांनी तब्बल पाच तास श्रमदान करत खड्डे बुजवले. शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलि सांच्या या पथकाने श्रमदान करत महापालि का प्रशासनाला चांगलीच चपराक लगावली आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहाड रेल्वे उड्डाणपुलाचा पूर्वेकडील भाग, उल्हासनगर पश्चिम परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता टिटवाळा, मुरबाडला जोडणारा असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषराजे पठाणे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एक पथक नेमले. या पथकाने श्रमदान करत शहरातील सर्व खड्डे बारीक खडीच्या मदतीने बुजवले.

या पथकाने कामगिरी बजावली
मनीषराजे पठाणे यांच्या मदती हवालदार विनायक धुरी, शिपाई अमोल कांबळे, वॉर्डन योगेश मोरे या पथकाने ही कामगिरी बजावली. केवळ महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहतूक पोलिसांनी पार पडलेल्या कर्तव्यामुळे वाहनचाल कांना काहीसा दिलासा मिळाला आहे.