Cooking Tips – कारल्याची भाजी अशापद्धतीने कराल, तर घरातील सर्वजण आनंदाने खातील, वाचा

कारलं तुपात घोळा नाहीतर साखरेत घोळा कारलं कडू ते कडूच राहणार ही म्हण आपण खूप लहानपणापासून ऐकली आहे. आपल्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या या खूप गरजेच्या आहेत. या भाज्यांमधील एक नाव म्हणजे कारलं. परंतु कारलं म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. अशावेळी आपण कारल्याची भाजी करण्यासाठी टाळाटाळ करतो. घरामध्ये कुणीही कारल्याची भाजी खात नसेल तर, आता मात्र या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही फाॅलो केल्या तर कारल्याची भाजी घरातील मंडळी चाटून पुसून खातील.

कोणताही पदार्थ करताना, गृहिणीची खऱ्या अर्थाने कसरत असते. घरातील सर्वजणांना आवडेल की नाही याचा विचार गृहिणी करतात. परंतु काही महत्त्वाच्या टिप्स आपण अंमलात आणल्या तर, कारल्याची भाजीही तितकीच चविष्ट होईल.

कारल्याची चव ही कडू असल्यामुळे, आपण ती खाण्यासाठी फार उत्सुक नसतो. परंतु याच भाजीचे आरोग्याच्या दृष्टीने मात्र भरमसाठ उपयोग आहेत. कारल्याची भाजी खाल्ल्यामुळे मधुमेहासारख्या आजारांपासून दूर राहता येते.

कारल्याची भाजी करताना या टिप्स वापरा

 

  • कारल्याच्या भाजीमध्ये चिंचेचा वापर केल्यास, कारल्याची भाजी अतिशय चविष्ट होते. तसेच कारल्याच्या चवीमध्येही खूप फरक पडतो. चिंचेचा कोळ करुन घातल्यास, कारल्याची भाजी न करुन खाणारेही बोटं चाटून खातील.

  • कारल्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट घातल्यास, कारल्याच्या भाजीचा कडवटपणा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.

  • कारल्याच्या भाजीमध्ये गूळाचा छोटा खडा घातल्यास, कारल्याच्या भाजीला सुंदर चव येते. यामुळे कारल्याचा कडूपणा बऱ्याच अंशी कमी होतो.

  • कारल्याच्या भाजीमध्ये सुके खोबरे, जिरे, तीळ यांचे दरदरीत वाटण घालून भाजी केल्यास, भाजी अधिक चविष्ट होते.

  • कारल्याच्या भाजीमध्ये ओले खोबरे घातल्याने, भाजीचा कडवटपणा अर्धाअधिक निघून जातो.

  • कारल्याच्या भाजीमध्ये तीळ, जीरे, कोथिंबीर, आलं, लसूण यांची फोडणी दिल्यामुळे, भाजीचा कडवटपणा निघून जातो.

  • कांद्याचा अधिक वापर केल्यामुळे, कारल्याची चव अधिक वाढते. त्यामुळे भाजीचा कडवटपणाही निघून जातो.

  • कारली चिरुन झाल्यानंतर, कारल्याला थोडेसे मीठ लावून ठेवल्यास कारल्याचा कडवटपणा निघून जातो. मीठ लावून ठेवल्यावर, कारल्याला पाणी सुटते. नंतर हे पाणी काढून टाकून कारल्याची भाजी करावी.

फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी