
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज आणि एक शांत संयमी खेळाडू म्हणून क्रिकेट विश्वात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या जोस बटलरने जगातील सर्वात परफेक्ट खेळाडूचं नाव सांगितलं आहे. सध्याच्या घडीला विराट कोहलीला जगातील पहिला क्रमांकाचा खेळाडू म्हणून नावाजलं जात. परंतु जोस बटलर याला अपवाद ठरला आहे. त्याने विराट कोहली नाही तर मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सला जगातील सर्वात परफेक्ट खेळडू म्हटलं आहे.
जोस बटलरने For The Love Of Cricket Podcast वर बोलत असताना आपल्या भावना व्यक्त करत असताना एबी डिव्हिलियर्सला जगातील सर्वात परफेक्ट खेळाडू मानलं आहे. तो म्हणाला की, “मला एबी पसंत आहे. माझ्यासाठी तो एका हिरोसारखा आहे. तो एक अद्भुत खेळाडू होता. फलंदाजी करताना आणि यष्टीरक्षण करताना तो मला खूप जास्त आवडतो. हे फक्त माझे मत आहे, त्यामुळे मला माहितीये बरेच जण मला चुकीच समजतील, परंतु माझं मत आहे की एबी डिव्हिलियर्स जागतीक क्रिकेमधील सर्वात परफेक्ट फलंदाज आहे. त्याला तुम्ही कोणत्याही फॉरमेटमध्ये उतरवा, तो तुम्हाला सामना जिंकवून देतो.” असं जोस बटलर म्हणाला आहे.
“टी-20 सामन्यात तुम्ही त्याला शेवटच्या सहा षटकांमध्ये 15 किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग करायला सांगितलं तर तर तो करेल. तो तुम्हाला सामना जिंकवून देईल. तो त्याच्यामध्ये माहिर आहे. तुम्हाला नाही वाटत का तो एक खतरनाक फलंदाज आहे. एबी माझ्यासाठी हिरो राहिला आहे. त्याच्याविरुद्ध खेळत असताना त्याला मी थोडफार ओळखू शकलो आहे.” असं जोस बटलरने आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे