
भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापुरातील घरासमोरच दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने देवाभाऊंच्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. दोन टोळय़ांतील अंतर्गत वादातून एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलीस बंदोबस्त असतानाही गावगुंडांनी राडा केल्याने भीतीचे वातावरण आहे.
बदलापूर गाव येथे राहणाऱ्या अल्ताफ शेख या युवकाचे शहरातील काही टोळक्यांसोबत जागेवरून वाद सुरू होते. गंभीर जखमी अल्ताफवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरव यांनी तपास सुरू केला आहे.