18 उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या, सहा एसीपी बनले डीसीपी

राज्यातील 18 उपायुक्तांच्या पुन्हा नवीन ठिकाणी बदलीचे आदेश आज जारी करण्यात आले, तर सहा सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त पदी बढती देण्यात आली. गृह विभागाने बढती आणि बदलीचे आदेश जारी केले.

काही दिवसांपूर्वी राज्यातील उपायुक्त/अधीक्षकांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 18 अधिकाऱ्यांच्या नव्याने बदलीचे आदेश आज जारी करण्यात आले. त्यानुसार विजय कबाडे – नागपूर शहर (एक वर्ष मुदतवाढ), योगेश चव्हाण – राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), अशोक थोरात – अपर अधीक्षक (यवतमाळ), अमोल झेंडे – महानगर विकास प्राधिकरण (पुणे), दीपक देवराज – नागरी हक्क संरक्षण (ठाणे – एक वर्ष मुदतवाढ), सागर पाटील – कायदा व सुव्यवस्था (महाराष्ट्र राज्य), स्मिता पाटील – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, जयंत बजबळे – नागरी हक्क संरक्षण (ठाणे), सुनील लांजेवार – राज्य गुप्तवार्ता विभाग (छत्रपती संभाजीनगर), जयश्री गायकवाड – गुन्हे अन्वेषण विभाग (कोल्हापूर), रत्नाकर नवले – छत्रपती संभाजीनगर, प्रशांत बच्छाव – नागरी हक्क संरक्षण (नाशिक), नम्रता पाटील – राज्य गुप्तवार्ता विभाग (नाशिक), अमोल गायकवाड – बुलढाणा (अपर अधीक्षक), पियूष जगताप – रा.रा. पोलीस बल (चंद्रपूर), बजरंग बनसोडे – दहशतवादविरोधी पथक (छत्रपती संभाजीनगर), ज्योती क्षीरसागर – नागरी हक्क संरक्षण (कोल्हापूर), श्रीराम वाघचौरे – श्रीरामपूर (अपर अधीक्षक).