गोड बातमी आली! 40 व्या वर्षी बाबा होणार हा अभिनेता; पत्नी म्हणाली, आम्ही 15 वर्षांपासून…

बाप होण्याचे सुख काही औरच असते. चिमुकल्याचे बोबडे बोल ऐकले आणि घरभर दुडूदुडू धावणारी पावले पाहिली की कामाचा सर्व ताणच निघून जातो. अनेकांना हे सुख मिळते, तर काही वंचितही राहतात. अर्थात काहींना हे सुख उशिराही मिळते. आता हेच बाबा होण्याचे सुख बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावही अनुभवणार आहेत. राजकुमार रावच्या घराच पाळणा हलणार असून 9 जुलै रोजी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांनी पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक असल्याचे म्हटले. बाप होणार ही चांगली भावना आहे. मला आजही यावर विश्वास बसत नाहीय. आमच्या आयुष्यातील सुवर्ण पर्व सुरू होणार असल्याचे माझे मित्र मला म्हणतात, असे राजकुमार राव याने म्हटले. तसेच आयुष्याच्या या सुवर्ण पर्वासाठी मी खुपच उत्साही असल्याचे तो म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

दुसरीकडे पत्रलेखा हिनेही आई होणार म्हणून आनंद व्यक्त केला. आम्ही गेल्या 15 वर्षापासून एकमेकांसोबत आहोत. आम्ही सोबतच मोठे झालो आणि आता आम्ही आई-बाबा होणार आहोत. हे आमच्या नात्यात नैसर्गिक वाढ होण्यासारखेच आहे, असे पत्रलेखा म्हणाली.

राजकुमार राव आणि पत्रलेखा हे 11 वर्षाच्या मैत्रीनंतर लग्नाच्या बेडीत अडकले होते. 15 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांनी लग्न केले. चंदीगडमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांना आई-बाबा होण्याचे सुख मिळणार आहे. दरम्यान, राजकुमार राव याने ही गोड बातमी दिल्यापासून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजकुमार राव याच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, लवकर त्याचा मालिक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुलकित याने हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. तर दुसरीकडे पत्रलेखा ही बहुचर्चित फुले या चित्रपटामध्ये दिसली होती.