
स्टंटसाठी नको ते धाडस करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कोणत्याही औपचारीक प्रशिक्षणाशिवाय कोब्रा साप हातात पकडून स्टंट करताना सापाने दंश केल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. लकी बगाडे असे मयत तरुणाचे नाव आहे. गोंदिया येथे ही धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोब्राने दंश केल्यानंतर लकीला तात्काळ तुमसर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान लकीचा मृत्यू झाला. सापासोबत स्टंट करणे लकीच्या चांगलेच अंगलट आले.