तासन्तास रिल्स बघण्याने वाट लागतेय, विचार आणि निर्णयक्षमतेवर होतोय दुष्परिणाम

लोक तासन्तास व्हिडियो सर्फींगमध्ये घालवत आहेत. याचे दुष्पपरिणाम आता समोर आले आहेत. काही सेकंदाचे हे व्हिडियो केवळ टाईमपासचे साधन नाही, तर हळूहळू लोकांच्या मेंदूवर आणि विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. अलिकडच्या नव्या अभ्यासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. शॉर्ट व्हिडियोंचे व्यसन लोकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यापासून परावृत्त करतात आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे अभ्यासाअंती आढळून आलंय.

चीनच्या टिआनिंजन नॉर्मल युनिर्व्हसिटीने यासंदर्भात अभ्यास केला आहे. न्यूरोइमेज जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. त्यानुसार जे लोक टिकटॉक किंवा रिल्स व्हिडियोंवर तासनतास घालवतात, त्यांच्या निर्णयक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्या मेंदूतील लॉस एवर्जन म्हणजे नुकसान होण्यापासून वाचण्याच्या प्रवृतीत कमपुवतपणा येतो.

एक व्हिडियो बघा, आनंद घ्या मग दुसरा व्हिडियो… अशी साखळी सुरू राहते. याचा परिणाम मेंदूवर होतो. तुम्ही संथगतीने विचार करता. आयुष्यातील मोठे आणि जरुरी निर्णय घाईगडबडीत घेता. कोणताही विचार न करता. ही समस्या केवळ मेंदूपुरती मर्यादित न राहता दिनक्रम आणि जीवनशैलीवर प्रभाव करतात. एक व्हिडियो बघता बघता रात्र कशी संपते कळत नाही. त्यामुळे चिडचिडपणा, नैराश्य, आत्मविश्वास कमी होतो.

या दुष्पपरिणामापासून वाचायचे असेल तर स्क्रीन टाईमवर नियंत्रण आणायला हवे.  मोबाईल दूर ठेवून पुस्तके वाचा. व्यायाम करा. एखादा छंद जोपासा.