Monsoon Session 2025 – पालघरमधील 19 हजार विद्यार्थी गणवेशाविना

शाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी पालघर जिह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 19 हजार विद्यार्थी अद्याप गणवेशाविना असल्याची गंभीर बाब विधान परिषदेत उजेडात आली. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले, मात्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण गंभीर असून सोमवारी तातडीने बैठक घेऊन दोषींवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले. यासंदर्भात काँग्रेसच्या भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.