
ऐतिहासिक वारसा असलेल्या अंधेरी पश्चिम येथील जागृत गावदेवी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्टतर्फे होमहवन आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित राहून आई गावदेवीचे मनोभावे दर्शन घेतले.
मंदिर आणि परिसराची पाहणी करत या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले. तसेच गावदेवी मंदिराच्या पायथ्याशी शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांच्या निधीतून सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. प्रभागातील पंढरपूरहून वारी करून आलेल्या वारकऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, शिवसेना नेते अनंत गीते, विभाग संघटक अनिता बागवेदेखील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. मंदिराचे विश्वस्त हरीश नेवरेकर, उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, शाखाप्रमुख उदय महाले, दयानंद कडी, सुनील बिरजे व विजय धुमाळ, यल्लपा कुशाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.