
सध्या बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणी आणि ‘वन नेशन वन इलेक्शन’चा मुद्दा चर्चेचा विषय आहे. अशा स्थितीत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि जेएस खेहर यांनी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत परखड मते मांडली. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ निवडणूक प्रणाली लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाला बेलगाम अधिकार दिले जाऊ नयेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. संविधान विधेयक, 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे विधेयक, 2024चे परीक्षण करणाऱया जेपीसीच्या बैठकीत दोन्ही माजी सरन्यायाधीशांनी निरीक्षण मांडले.
निवडणुकांच्या प्रक्रियेवर देखरेख यंत्रणा हवी
याआधी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही प्रस्तावित घटनादुरुस्ती कायद्यात निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर डीवाय चंद्रचूड आणि जेएस खेहर यांनी निवडणुकांच्या प्रक्रियेवर देखरेख यंत्रणा असावी असे सुचवले.