कोल्हापुरात राहिलो, मराठी शिकलो – आर माधवन

कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या आर. माधवनने मराठी भाषेसंदर्भातील मत एका मुलाखतीत मांडले. आर. माधवन म्हणाला, ‘मी तामीळ आहे, पण मला हिंदी उत्तम येतं. मी जमशेदपूरमध्ये मोठा झालो, त्यामुळे तिथं हिंदीच बोलली जायची. पुढे मी कोल्हापूरमध्ये राहिलो, तिथे मी मराठीही शिकलो. त्यामुळे भाषेची कधीच अडचण वाटली नाही. जिथे मी राहिलो तिथली भाषा मी शिकली. त्यामुळे मला कधीही संवाद साधायला अडचण झाली नाही. भाषा ही आपल्याला जोडण्यासाठी असते,’ असे माधवन म्हणाला.