50 हजार लोक आणि दाल-बाटी-चूरमा

राजे महाराजांच्या काळातील अनेक वर्षांची जुनी परंपरा ‘ज्योणार’ आता जयपूरमध्ये पुन्हा सुरू झाली आहे. जयपूरच्या अगरवाल ग्राऊंडमध्ये भव्य सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 50 हजार लोकांनी शुद्ध देशी तुपात बनलेल्या दाल-बाटी-चूरमाचा आनंद घेतला. 100 वर्षांनी ‘ज्योणार’ची परंपरा पुनरुज्जीवित झाली. भोजन 500 मिठाई बनवणारे आणि 200 मदतनीस यांनी तयार केले. 12, 500 किलो आटा-बेसन, 1500 किलो डाळ लागली.