180 ऐवजी 155 प्रवाशांना घेऊन उडाले विमान

एअर इंडियाच्या गोंधळाची मालिका काही संपत नसल्याचे दिसत आहे. आता गुजरातच्या भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 25 प्रवाशांना चढताच आले नाही. या विमानाने 180 ऐवजी केवळ 155 प्रवाशांना घेऊनच उड्डाण केले. एअर इंडियाच्या या कारभाराविरोधात आज प्रवाशांनी एअर इंडियाविरोधात जोरदार निदर्शने केली. आसनांच्या कमतरेमुळे अनेक प्रवाशांना मुंबईला जाता आले नाही. तर आधीच बुकिंग करूनही सीट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. प्रवाशांनी एअर इंडिया एअरलाईनवर गैरव्यवस्थापनाचे गंभीर आरोप केले आहेत.