स्वयंपुनर्विकास समितीचा आज अहवाल

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने रहिवाशांकडून आलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून तयार केलेला अहवाल विधान भवन येथील मुख्यमंत्री समिती कक्ष येथे शासनास सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत.