डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

रायगड किल्ला येथे सहलीसाठी निघालेल्या तरुणाच्या मोटरसायकलला डंपरने धडक दिली. त्या धडकेत हसन इद्रिसी या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक हा पळून गेला आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. अशरफ शेख हा गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात राहतो. अपघाताची माहिती समजताच मानखुर्द पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी हसनला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच अशरफलादेखील गंभीर दुखापत झाली.