
आजारपणाला कंटाळून पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. शंकर सोळसे असे मृत पोलिसाचे नाव आहे. दीड वर्षापूवी शंकर यांचा अपघात झाला होता. त्यात त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले होते. शंकर हे विक्रोळी वाहतूक शाखेत सहाय्यक फौजदार म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री जेवण झाल्यावर ते तळमजल्यावर झोपले होते. सकाळी उठल्यानंतर कुटुंबीयांना शंकरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.