Ratnagiri News – चिपळूणात 130 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, लढत रंगतदार होण्याची शक्यता

चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील 130 ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार पालवण, दळवटणे, खडपोली या ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर टेरव, वेहेळे या अनुसूचित जाती महिलांसाठी आणि डेरवण ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. तर तालुक्यातील बहुतांशी श्रीमंत ग्रामपंचायतीत सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी राहिल्याने येथील सरपंचपदाची लढत रंगतदार होण्याची शक्यता बळावली आहे.

तालुक्यातील विविध राजकीय पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंचपदाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार मागास प्रवर्गाकरीता देवखेरकी, कुशिवडे, नायशी, नांदिवसे, तुरंबव, ताम्हणमळा, ढाकमोली, निर्व्हाळ, मुर्तवडे, वीर देवपाट, तळसर, शिरगांव, कालुस्ते बुद्रुक, सावर्डे, हडकणी, कळंबस्ते सोडत काढण्यात आली.

मागास प्रवर्ग महिलांकरीता असुर्डे, तिवरे, कादवड, नारदखेरकी, बामणोली, मालघर, रावळगांव, खोपड, गांग्रई, तळवडे, रिक्टोटो, अनारी, वालोपे, कापसाळ, तनाळी, रामपूर, कुडप, धामणवणे, सर्वसाधारण महिलांकरीता येगांव, आगवे, नांदगाव खुर्द, मांडकी खुर्द, आंबतखोल, कळकवणे दादर, निरबाडे, नवीन कोळकेवाडी, गुळवणे, कात्रोळी, चिवेली लोणारी बंदर, मार्गताम्हाणे, गोंधळे, पाचाड, गुढे, डुगवे, पिलवली तर्फे वेळंब, आबिटगाव, वहाळ, मुंढे तर्फे चिपळूण, कुंभार्ली, पोफळी, रेहेळवैजी, पोसरे, धामेली कोंड, करंबवणे, केतकी, दुर्गवाडी, कळवंडे, फुरूस, कुटरे, मार्गताम्हाणे खुर्द, वाघिवरे, कोंडमळा, खरवते, चिंचघरी, मिरजोळी, बोरगाव, नागावे, कान्हे, तोंडली, मुंडे तर्फे सावर्डे, कळमुंडी या ग्रामपंचायतीत सोडत काढण्यात आली आहे.

सर्वसाधारण प्रवर्गाकरीता कोकरे, खेरशेत, ओवळी, तिवडी, आकले, पिंपळी खुर्द, पिंपळी बुद्रुक, गाणे, अडरे, खेर्डी, खांदाटपाली, कोंढे, कामथे, कामथे खुर्द, परशुराम, पेढे, ढोक्रवली, ओमळी, उभळे आगरगांव, उमरोली, शिरवली, पिलवली तर्फे सावर्डे, खांडोत्री, अलोरे, कोंडफणसवणे, दोणवली, कालुस्ते खुर्द, भिले, कापरे, बिवली, मालदोली, कोसबी, दहिवली खुर्द, दहिवली बुद्रुक, मांडकी बुद्रुक, मोरवणे, कौंढरताम्हाणे, कळंबट, पेढांबे, कोळेवाडी, निवळी, वालोटी, मिरवणे, वडेरू आणि नांदगाव या ग्रामपंचायतीत सोडत काढण्यात आली.

येत्या काही महिन्यांत तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. सध्या जाहीर झालेले सरपंपदाचे आरक्षण 2025-2030 या पाच वर्षांकरीता लागू झालेले आहे. सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.