
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. खेडमध्ये जगबुडी नदी,संगमेश्वर मध्ये शास्त्री नदी आणि राजापूर तालुक्यात कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 114.88 मिमी पाऊस पडला आहे. नाचणे येथे झाड पडून दोघेजण आणि निवखोल येथे झाड पडून दोघजण जखमी झाले असून घरांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी
मंडणगड – 114.00 मिमी, खेड – 96.85 मिमी
दापोली – 93.71 मिमी
दापोली – 93.71 मिमी
चिपळूण – 134.56 मिमी
गुहागर – 111.40 मिमी
संगमेश्वर – 142.25 मिमी
रत्नागिरी – 143.11 मिमी
लांजा – 112.20 मिमी
राजापूर – 85.87 मिमी
राजापूर – 85.87 मिमी