ही हुकूमशाहीच! ट्रम्प यांच्याविरोधात शिकागोत हजारो लोक रस्त्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांविरोधात अमेरिकेत पुन्हा एकदा जनक्षोभ उसळला. तब्बल 1 हजार 600 हून अधिक ठिकाणी ट्रम्प यांचा हुकूमशहा असा उल्लेख करत हजारो लोक शिकागो येथे रस्त्यावर उतरले.स्थलांतरितांना हद्दपार करणे आणि गरीबांसाठीच्या वैद्यकीय सुविधा कमी करणे अशा धोरणांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

‘गुड ट्रबल लीव्हज ऑन’ असे नाव या आंदोलनाला देण्यात आले. आजचा दिवस हा राष्ट्रीय पृती दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस दिवंगत खासदार आणि मानवाधिकार कार्यकर्ते जॉन लुईस यांना समर्पित असून निदर्शने शांततेत सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

देश कठीण काळातून जातोय

शहरातील मध्यभागी हजारो आंदोलक जमले आणि शिकागोमध्ये आयोजित रॅलीत मेणबत्ती मार्चही काढण्यात आला. देश कठीण काळातून जात आहे. सरकारमध्ये हुकूमशाही वृत्ती वाढली असून कायद्याचे वारंवार उल्लंघन होत आहे. त्यामुळे लोकशाहीने दिलेल्या अधिकारांवर गदा येत आहे, असे पब्लिक सिटीझन ग्रुपच्या सहअध्यक्षा लिसा गिल्बर्ट म्हणाल्या.