
शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांची मुख्य गुंतवणूक असलेल्या हेरिटेज फूडस लिमिटेडच्या स्टॉकमध्ये 7.7 टक्क्यांची वाढ झाली. हेरिटेज फूडसचा स्टॉक शुक्रवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 49 रुपयांवर पोहोचला होता. हेरिटेज फूडस लिमिटेडचा स्टॉक शुक्रवारी 32.90 रुपयांनी वाढून 491 रुपयांवर पोहोचला. यामुळे नारा भुवनेश्वरी यांची संपत्ती एकूण 79 कोटी रुपयांनी वाढली.
नारा भुवनेश्वरी यांच्याकडे हेरिटेज फूडसचे 2,26,11,525 शेअर आहेत. कंपनीतील त्यांची भागीदारी जून 2025 च्या अहवालानुसार 24.37 टक्के इतकी आहे. हेरिटेज फूडसने त्यांचे आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांनतर कंपनीच्या शेअर्सने उसळी घेतली. हेरिटेज फूडस ही दक्षिणेकडील डेअरी कंपनी आहे. डेअरी, रिटेल आणि कृषी उत्पादनांशी संबंधित क्षेत्रात कंपनी काम करते.