
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान रोहित पवार यांनी राहुल गांधी यांना अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावरही लोकसभेत आवाज उठवून याबाबत निष्पक्ष चौकशी करण्यास सरकारला भाग पाडा, अशी विनंती यावेळी रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी गुरुवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती दिली. लोकसभेतील प्रभावी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी अर्ध्या तासाहून अधिक विस्तृत चर्चा केली. तसेच या अपघाताबाबत वेगवेगळ्या स्त्रोतांकडून आम्ही अत्यंत मेहनतीने जमा केलेली संपूर्ण माहिती त्यांना दिली आणि जनहिताचे इतर विषय ज्याप्रमाणे लोकसभेत लावून धरतात त्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताच्या विषयावरही लोकसभेत आवाज उठवून याबाबत निष्पक्ष चौकशी करण्यास सरकारला भाग पाडा, अशी विनंती त्यांना केली, असे रोहित पवार यांनी सांगितले.
लोकसभेतील प्रभावी विरोधी पक्षनेते माननीय राहुल जी गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी अर्ध्या तासाहून अधिक विस्तृत चर्चा केली.
तसंच या अपघाताबाबत वेगवेगळ्या स्त्रोतांकडून आम्ही अत्यंत मेहनतीने जमा केलेली संपूर्ण माहिती त्यांना… pic.twitter.com/iWQarTj32W
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 12, 2026
दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनाही संशय आहे. यावर महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याही भेटी घेतल्या आहेत. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी यांचीही भेट घेत रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघाताच्या विषयावरही लोकसभेत आवाज उठवण्याची विनंती केली.
Ajit Pawar Plane Crash – रोहित पवारांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली, नेमकी काय झाली चर्चा?




























































