
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची स्टार तिरंदाज शीतल देवी हिने इतिहास रचला आहे. महिलांच्या कंपाउंड तिरंदाजीच्या पात्रता फेरीत 720 पैकी तब्बल 704 गुणांची कमाई करत तिने विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे, शीतलने या कामगिरीसह 698 गुणांचा आशियाई विक्रमही मागे टाकला. हिंदुस्थानची आणखी एक तिरंदाज पायल नाग हिनेही पदार्पणात चमकदार कामगिरी करत पाचवे स्थान मिळवली आणि आपली छाप पाडली.
जम्मू-कश्मीरची 19 वर्षीय शीतल देवी हिने नागोया येथे दमदार कामगरि. तिने एकूण 72 बाणांपैकी 57 बाणांद्वारे 10 गुण मिळवले. यापैकी 32 बाण लक्ष्याच्या मध्यभागातील सर्वाधिक अचूक गुण देणाऱ्या एक्स झोनमध्ये लागले. दुसरीकडे पायल नाग हिनेही प्रभावी कामगिरी केली. तिने 675 गुण मिळवत पाचवे स्थान पटकावले. त्यामुळे महिलांच्या कंपाउंड प्रकारात हिंदुस्थानच्या पदकाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
Asian Para Games: Sheetal Devi equals world record in compound archery
Read @ANI Story |https://t.co/Cm9HEhCwJd
#Archery #SheetalDevi #AsianGames https://t.co/0aX8CWJdcQ
— ANI Digital (@ani_digital) October 19, 2026
विश्वविक्रमाची बरोबरी
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या शीतलने यापूर्वी मार्च महिन्यात 698 गुणांसह आशियाई विक्रम प्रस्थापित केला होता. नागोया येथे तिने त्यात आणखी सहा गुणांची भर घातली. महिलांच्या कंपाउंड तिरंदाजीतील 704 गुणांचा विश्वविक्रम तुर्कियेच्या ओझनूर गिर्डी हिने 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नोंदवला होता. शीतलने त्याच विक्रमाशी बरोबरी साधत आपल्या कौशल्याची पुन्हा एकदा झलक दाखवली.
सांघिक पात्रता फेरीत हिंदुस्थान अव्वल
शीतल देवी आणि पायल नाग यांनी मिळून महिलांच्या कंपाउंड सांघिक पात्रता फेरीत हिंदुस्थानला अव्वल स्थान मिळवून दिले. दोघींनी मिळून एकूण 1379 गुणांची नोंद केली. चीनने 1338 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानले. या अव्वल कामगिरीमुळे हिंदुस्थानी संघाने थेट उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता उपांत्य फेरीत हिंदुस्थानचा सामना पाचव्या मानांकित थायलंड आणि चौथ्या मानांकित कझाकस्तान यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या विजेत्या संघाशी होणार आहे.



























































