Health – मिठामुळे पदार्थाची चव कशी वाढते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीठ जगभरातील जवळपास प्रत्येक प्रकारच्या अन्न पदार्थांमध्ये आढळून येतं. ते कधी बारीक दाणे किंवा कणांच्या रूपात वापरलं जातं, तर कधी काही मूलभूत मसाले किंवा चटण्यांचा भाग म्हणून असतं. उदाहरणार्थ, सोया सॉसमध्ये सुमारे 14 ते 18 टक्के मीठ असू शकतं. रासायनिक दृष्टय़ा मिठाला ‘सोडियम क्लोराइड’ म्हणतात. ते सोडियम आणि क्लोरीन या दोन घटकांपासून बनलेलं असतं. हे दोन्ही घटक आयर्न म्हणजेच विद्युत भार असलेले अणू असतात. या छोटय़ा स्फटिकांपैकी (ािढस्टल्स) एखादा जेव्हा आपल्या जिभेला स्पर्श करतो तेव्हा नेमकं काय घडतं? चव ही अशी भावना आहे जी, आपल्याला आपल्या चव-ग्रंथींच्या (टेस्ट बड्स) मदतीने आसपासच्या वातावरणात असलेल्या रासायनिक पदार्थांना ओळखण्यास मदत करते. या पेशींमध्ये असे रिसेप्टर्स असतात. जे विशिष्ट प्रकारच्या रासायनिक पदार्थांना ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी विकसित झालेले असतात. पेशीच्या (सेल) पृष्ठभागावर असलेले लहान छिद्रं असतात. ही छिद्रं फक्त काही विशिष्ट आयन आत जाऊ देतात. जेव्हा सोडियम आयन उपस्थित असतात, तेव्हा ते या लहान मार्गाने पेशीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे ती पेशी सोडियम आहे हे ओळखते आणि एक विद्युत सिग्नल तयार करते. हा सिग्नल नंतर नसांमधून मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. अशा प्रकारे आपल्याला मिठाची चव जाणवते.