बळीराजावरील अरिष्ट टळू दे, महाराष्ट्राला पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे…रश्मी ठाकरे यांचे टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीला साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. बळीराजा संकटात आहे. बळीराजावरील हे अरिष्ट टळू दे आणि महाराष्ट्राला पुन्हा सुखाचे, वैभवाचे दिवस येऊ दे, असे साकडे आज रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीला घातले. यावेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे दुर्गेश्वरीच्या उत्सवाची परंपरा सुरू केली. रश्मी ठाकरे यांनी आज या देवीचे दर्शन घेतले आणि देवीची खणानारळाने ओटी भरून महाआरती केली. राज्यात पडलेला दुष्काळ दूर होऊ दे… जनतेला सुखसमृद्धी, स्थैर्य आणि आनंद लाभू दे, महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस येऊ दे, असे साकडे त्यांनी देवीला घातले.

यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, मंदार विचारे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, आकांक्षा राणे, अनिता प्रभू यांच्यासह महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.