ज्ञानेश कुमार गो बॅक, पुण्यात ‘सीजेपी’चे लहरा दो तिरंगा आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोग हा संघ-भाजपची शाखा बनवण्यापासून रोखा, ईव्हीएमवर बंदी घालून निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे पुण्यात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन करण्यात आले. ‘मतचोरी नहीं चलेगी’, ‘मोदी सरकार गो बॅक’, ‘ज्ञानेश कुमार गो बॅक’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सीजेपीच्या नेत्यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सीजेपीच्या वतीने शनिवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. एसआयआर प्रभावित राज्यांमध्ये पुन्हा निवडणुका घ्या, जुन्या मतदार याद्या पुनर्स्थापित करा, ज्ञानेश कुमार यांना अटक करा, ईव्हीएमवर बंदी घाला, मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.