ज्ञानेश कुमार यांना हटवा, द्रमुकच्या बैठकीत ठराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एसआयआर’ला विरोध करणाऱया विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनांना डीएमकेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्यासह चार ठराव डीएमकेच्या संसदीय बैठकीत पारित करण्यात आले.

डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी बैठकीत पारित करण्यात आलेल्या ठरावांबाबत माहिती दिली. ज्ञानेश कुमार यांना तत्काळ पदावरून हटवून त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी. एसआयआरला तत्काळ रद्द करण्यात यावे. यासंदर्भात एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचे ए. राजा यांनी सांगितले.