
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मोठ्या उलथापालथी सुरू असून आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनी मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई इंडियन्सने शनिवारी याबाबत निवेदन जारी करत अधिकृत माहिती दिली.
महेला जयवर्धने यांचा मुंबई इंडियन्सबरोबरचा प्रवास सुमारे एक दशकाचा राहिला. ते प्रथम 2017 मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले आणि 2022 पर्यंत त्यांनी ही भूमिका सांभाळली. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा ही धुरा हाती घेतली आणि 2026 पर्यंत संघासोबत काम केले. जयवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने तीन वेळा आयपीएलवर विजेतेपदाची मोहोर उमटवली.
Mahela has been much more than a Head Coach to Mumbai Indians. Under his leadership as Head Coach, Mumbai Indians won 3 IPL titles.
Read more https://t.co/GvYuetCKW5
— Mumbai Indians (@mipaltan) October 17, 2026




























































