
पत्नीला जी-पेवर एका व्यक्तीकडून वारंवार पैसे येत असल्याने संतप्त झालेल्या नवऱ्याने तिला जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या संशयी नवरोबाने तिला बेदम मारहाण केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. कळंबोली सेक्टर 4 ई येथील जनता मार्केट परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव पिंकी मनीष गोप ऊर्फ सोनिया मोहम्मद अबू खातून असे आहे.
प्राथमिक माहितीनुसार पत्नीच्या गुगल पे आणि बँक खात्यात इतर व्यक्तींकडून पैसे जमा होत असल्याच्या कारणावरून पती तिच्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर आणि पोलीस निरीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज सोनवणे, दिलीप चव्हाण, नितीन शिंदे तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले व अभय काळे यांनी कारवाई केली. या घटनेचा पुढील तपास कळंबोली पोलीस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलि क्राईम सांनी घटनास्थळी धाव घेत पतीला ताब्यात घेतले.



























































