दोन वनडे सामन्यांसाठी शुभमन गिलला विश्रांती; जसप्रीत बुमरा वनडे संघाच्या बाहेर, न्यूझीलंडच्या दौऱयासाठी वनडे आणि कसोटी संघ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडच्या दौऱयासाठी वनडे आणि कसोटी संघ जाहीर करण्यात आले आहेत; पण हे संघ जाहीर करताना बीसीसीआयने दोन वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत. शुभमन गिलला दोन वनडे सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. गिलच्या जागी श्रेयस अय्यरकडे दोन सामन्यांसाठी नेतृत्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर वनडे मालिकेमध्ये जसप्रीत बुमराला संधीच देण्यात आलेली नाही.

पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी हिंदुस्थानचा एकदिवसीय संघ ः शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, मोहम्मद सिराज, किशन सिंह, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव

चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी हिंदुस्थानचा एकदिवसीय संघ ः श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अकीब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक),मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.

हिंदुस्थानचा कसोटी संघ ः शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैसवाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमरा, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.