
स्वतःला पार्टी विथ डिफरंट सांगणाऱ्या भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षाने वादग्रस्त विधान केले आहे. मदन राठोड यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हटले की, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात जर युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानला साथ देऊ. त्यांच्या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठू लागली आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने मदन राठोड यांच्या या वक्तव्याच्या संदर्भ देत भाजपावर हल्लाबोल केला आहे. राठोड यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, मदन राठोड यांच्या या वक्तव्यावरून आता भाजप त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शामा मोहम्मद यांनी केला.


























































