मैदानावर आपल्या अनोख्या अंदाजात चाहत्यांना भूरळ पाडणाऱ्या जेमिमावर स्वित्झर्लंडने सोपवली मोठी जबाबदारी, वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. परंतू मैदानाबाहेरही तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चा फक्त हिंदुस्थानातच नाही तर जगाच्या कामाकोपऱ्यात होताना दिसत आहे. त्याच कारणही तसच असून स्वित्झर्लंड टूरिझमने जेमिमाची हिंदुस्थानसाठी ‘फ्रेंडशिप अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून तिची निवड केली आहे. त्यामुळे पुढील काळात जेमिमा स्वित्झर्लंडचं निसर्ग सौंदर्य हिंदुस्थानातील नागरिकांनी वेगळ्या आणि हटके अंदाजात दाखवताना पाहायला मिळू शकते.

या नवीन भूमिकेमुळे ती आता हिंदुस्थानातील पर्यटकांना स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य ठिकाणे, तेथील समृद्ध संस्कृती आणि पर्यटनाचे अनोखे अनुभव यांची ओळख करून देणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे एका विशेष कार्यक्रमात या भागीदारीची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये स्वित्झर्लंड टूरिझमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्टिन न्यडेगर हेदेखील उपस्थित होते. स्वित्झर्लंडने पर्यटनाला चालाना देण्याचं उद्धीष्ट डोळ्यांसमोर ठेवत हिंदुस्थानी नागरिकांना आकर्षीत करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे जेमिमाला मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले आहे. 3 ऑगस्ट रोजी इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेत ‘सर्दर्न ब्रेव’कडून खेळत असताना तिच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतूनही ती बाहेर राहिली आहे. मात्र, या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी संघात पुनरागमन करण्याचे तिचे मुख्य लक्ष्य आहे. स्वित्झर्लंडच्या पर्यटन प्रचाराची नवी जबाबदारी सांभाळत असतानाच, दुखापतीवर मात करून लवकरच पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या जर्सीत क्रिकेटच्या मैदानावर झळकण्यासाठी जेमिमा प्रयत्नशील असेल.