
हिंदुस्थानची स्टार खेळाडू आणि नवीन कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आज टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरली आहे. पूर्णवेळ कर्णधार म्हणून स्मृतीचा हा पहिलाच सामना आहे. टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. आज पहिला सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असून संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळताना लक्षवेधी कामगिरी करत 20 वर्षीय निकी प्रसादने या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघात आपलं स्थान पक्क केलं होतं. आणि पहिल्याच सामन्यात तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. नाफेफेकीच्या वेळी बोलताना कर्णधार स्मृती मंधाना हिने संघात अनेक तरुण खेळाडू असल्याचा उल्लेख केला, ज्यामध्ये निकीसह अनुष्काचाही समावेश आहे. या युवा खेळाडूंच्या समावेशामुळे संघात नवीन ऊर्जा पाहायला मिळत आहे.
Look at what it means
Congratulations to Niki Prasad who receives her T20I debut cap from Captain Smriti Mandhana
Updates ▶️ https://t.co/ZebQdoQIRo
#TeamIndia | #INDvZIM | @mflone_ | @mandhana_smriti https://t.co/4NzNiHMtMX
— BCCI Women (@BCCIWomen) October 16, 2026
निकी प्रसाद हिच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळते. याशिवाय, महिला प्रिमियर लीगमध्ये (डब्लूपीएल) ती दिल्ली कॅपिटल्सचा भाग असून, डब्लूपीएलच्या 18 सामन्यांमधील 7 डावांत फलंदाजी करताना तिने 30.60 च्या सरासरीने आणि 119.53 च्या स्ट्राइक रेटने 153 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 47 धावांची तिची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.






























































