
हुती बंडखोरांनी येमेनच्या अदन शहरात थेट राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्र हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी येमेनचे पंतप्रधान शाया मोहसेन अल-जिंदानी यांच्यासह अनेक मंत्री राष्ट्रपती भवनाच्या परिसरात उपस्थित होते. ते थोडक्यात बचावले. मात्र, या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचाऱयांसह 4 जणांचा मृत्यू झाला आहे.




























































