
ओडिशाचे नवनियुक्त खासदार बृज मोहन राम पदभार स्वीकारण्यापूर्वी वादाच्या भोवऱयात अडकले आहेत. राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर भाजपला बळकट करण्यासाठी काम करू, असे वक्तव्य बृज मोहन राम यांनी केले. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांना राज्यपालपदावरून हटविण्याची मागणी बीजेडीचे नेते व माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे.
बृज मोहन राम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, भाजपला अधिक मते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून भाजपला बळकट करण्यासाठी काम करू. या वक्तव्यावरून नवीन पटनायक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, राज्यपाल हा कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी नसतो, तो निष्पक्ष असायला हवा. मात्र नव्या राज्यपालांचा भाजपासाठी काम करण्याचा उत्साह सर्वांनीच पाहिला, अशी टीका नवीन पटनायक यांनी केली.
काँग्रेसचीही टीका
ओडिशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनीही भाजपवर कडाडून टीका करताना म्हटले की, राज्यपालांना संविधानिक जबाबदाऱया निष्पक्षपणे सांभाळाव्या लागतात. राजकीय पक्षाची मदत करणे किंवा राजकीय पक्षाला निवडणुकीत मदत व्हावी, अशी भूमिका राज्यपालांनी घेणे योग्य नाही. या विधानामुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. बृज मोहन राम यांना राज्यपालपद देऊ नये, अशी मागणी दास यांनी केली आहे.


























































