
इंग्लंडला पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याची सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. कर्नाटक हायकोर्टाच्या 2018 मधील आदेशाची प्रत मल्ल्याने पोस्ट केली असून मी राजासारखा जगलो, हीच माझी चूक झाली, असे त्याने म्हटले आहे.
मल्ल्यावर बँकांचे 6,203 कोटी रुपयांचे कर्ज होते. या कर्जाच्या वसुलीसाठी सुमारे 14,131.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता बँकांच्या पंसोर्टियमकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे या आदेशात नमूद आहे. त्यावर बोट ठेवत मल्ल्याने ही पोस्ट केली.
मी माझ्याच पैशाने ‘राजासारखं’ आयुष्य जगलो आणि हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली, ज्याची शिक्षा मला आता दिली जात आहे. मी अजूनही चोरच आहे का? सर्वांच्या वर एक देव आहे. कधीतरी मला नक्कीच न्याय मिळेल.























































