
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी (दि. १५) पाचव्या माळेनिमित्त ललिता पंचमीचा धार्मिक उत्साहात सोहळा पार पडला. यानिमित्त देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली.
धार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला होता. या परंपरेतून रथ अलंकार स्वरूपातील देवीच्या पूजेला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
दरम्यान, बुधवारी (दि. १४) चौथ्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.




























































