रशिया-युक्रेन युद्ध; 51 हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनविरोधातील  युद्धात रशियन सैन्यात सहभागी झालेल्या 51 हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात बुधवारी दिली. रशियन सैन्यात एकूण 267 हिंदुस्थानी तरुण सहभागी झाले होते. यापैकी 51 हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू झाला असून 77 हिंदुस्थानी तरुण अद्याप बेपत्ता आहेत, असेही केंद्र सरकारने कोर्टात माहिती दिली.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर परराष्ट्र मंत्रालयाने रशियन सैन्यात अडकलेल्या हिंदुस्थानींची सविस्तर आकडेवारी जाहीर केली. नुकसानभरपाई मिळवण्यात येणाऱ्या अडचणी, मृतांची डीएनए ओळख पटवणे आणि युद्धात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांचे मृतदेह देशात आणण्यास होणारा विलंब या मुद्दय़ांवरही सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे.