काऊंटरवरच्या रेल्वे तिकिटावरही विमा मिळणार, 27 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेचे तिकीट बुकिंग करताना आता ऑनलाइनप्रमाणे काऊंटरवरून रेल्वे तिकीट बुक केल्यानंतरही प्रवाशांना विमा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे विभागाला यासंबंधी आदेश दिले असून यासंबंधीचे नवे नियम 27 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. न्यायाधीश अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायाधीश आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सध्या केवळ ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनाच विमा दिला जात आहे, परंतु ऑफलाइन तिकिटांवरही ही सुविधा ऑनलाइन तिकिटाप्रमाणे ऐच्छिक असेल.